
सोलापूर : कामती खुर्द (ता. मोहोळ) येथील भगवान संदिपान अंकुशराव यांच्या शेतीच्या बांधावर १२ जून रोजी शेळ्या चारणाऱ्यांना एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी पोलिसांना खबर दिली आणि कामती पोलिस आता तो तरुण नेमका कोण आहे, कोठून त्याठिकाणी आला होता, याचा शोध घेत आहेत.