

Karhunnavi Festival Sparks Shopping Rush as Akkalkot Markets Come Alive
sakal
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात शेतकरी आणि बैलांच्या व इतर जनावरे पूजनाचा महत्वाचा सण म्हणजे कारहुण्णवीचा सण होय.येत्या मंगळवार ता. 14 जुन रोजी तालुक्यात सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने आणि गावागावात मिरवणुकीने साजरा केला जाणार आहे.यासाठी पूर्वतयारी म्हणून अक्कलकोट येथे व ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील बाजारात पूर्ण तयारीनीशी बाजारपेठ या साहित्याने सजली आहेत.