करमाळा : 'आदिनाथ'ला शिखर बॅंकेचे पत्र

कर्ज पुनर्गठनावरून गोंधळ शक्य; संचालकांच्या भूमिकेकडे लक्ष
‘आदिनाथ’
‘आदिनाथ’ sakal news

करमाळा : श्री आदिनाथ सह. साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा वाद डीआरडी कोर्टात सुरू असतानाच आता महाराष्ट्र राज्य सहकारी (एमएससी) बँकेने ‘राज्य बँक एकरकमी कर्ज परतफेड योजना २०२१ ’ अंतर्गत सहभागी होण्यासाठी पत्र पाठवले आहे.

कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी (ता. ६) जूनला हे ओटीएसचे पत्र आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक व संचालक मंडळाला आले आहे. आता यावर संचालक मंडळ काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आदिनाथ कारखान्याकडे साधारण ३०० कोटीची मालमत्ता आहे. थकीत कर्जामुळे बँकेने या कारखान्याचा लिलाव केला होता. त्यात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोला चालविण्यास देण्याचा निर्णय झाला होता. मात्र दोन वर्षांपासून याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्याचा डीआरडी कोर्टात सुरू असलेला वाद आणि बँकेचे कर्ज पुनर्गठन साठीचे पत्र यामुळे आता पुन्हा आदिनाथ सह. साखर कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू होण्याची चर्चा सुरु झाल्या आहेत. हे पत्र डीआयआरआर व कायदा विभागाचे उपसरव्यवस्थापक एन. एन. जाधव यांनी हे पत्र दिले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील इतर कारखान्यांना ३०० ते ४०० कोटी रुपयांचे कर्जाचे पुनर्गठन करून दिले. मात्र आदिनाथ कारखान्याचं केवळ ४५ कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी लिलाव काढला असल्याचे आदिनाथ बचाव समितीचे म्हणणे आहे.आदिनाथचे विद्यमान संचालक मंडळानेच कर्ज वसुली प्राधिकरण न्यालयालयाकडे कारखाना भाडेतत्त्वावर देण्यास विरोध करणारी याचिका दाखल केल्याने सध्या यावर सुनावणी सुरु आहे. ता.१७ रोजी न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला आहे. सोमवार (ता. २०) रोजी पुढील सुनावणी होणार आहे. कारखान्याकडे राज्य सहकारी बँकेचे ६४ कोटी कर्ज असून त्यावरील ४५ कोटी व्याज आहे, असे मिळून ११० कोटी कर्ज आहे. यापैकी ५५ कोटी रुपयांची साखर कारखान्यात शिल्लक आहे. आता शिखर बँकेने आदिनाथ कारखान्याच्या संचालक मंडळाला एक रकमी परतफेड योजनेमध्ये सहभागी होऊन कारखाना ताब्यात घेण्याची ऑफर दिली आहे.

पत्र ६ जूनला आले, १८ जूनला बाहेर पडले

राज्‍य शिखर बँकेने आदिनाथ सहकारी साखर कारखान्‍यास ६ जून रोजी कर्ज पुर्नगठनासाठी पत्र पाठवले. मात्र या पत्राची वाच्च्यता १२ दिवस करण्‍यात आली नाही. त्‍यामुळे हे पत्र झाकून ठेवण्‍यामागे नेमका हेतू काय असा प्रश्‍‍न उपस्‍थित होत आहे. आता संचालक मंडळ या पत्रावर कोणता निर्णय घेणार याकडे आदिनाथच्‍या सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com