करमाळा हादरलं! 'भाजपच्या शहराध्यक्षांवर जीवघेणा हल्ला'; जगदीश आगरवाल जखमी; ‘मी मोठा की तू’ यातून मारहाण
BJP City President Attacked in Karmala: जगदीश आगरवाल यांचे करमाळा बायपासलगत आगरवाल फूड मॉल नावाचे हॉटेल आहे. आगरवाल हॉटेलमध्ये असताना पाच ते सहाजण त्या ठिकाणी आले. त्यांनी शिवीगाळ करीत आगरवाल यांच्यावर हल्ला केला.
Karmala shaken after BJP leader Jagdish Agarwal is brutally attacked over a political ego clash.Sakal
करमाळा : भाजपचे करमाळ्याचे शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांच्यावर पाच ते सहा जणांनी मिळून १४ राेजी दुपारी दोनच्या सुमारास जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी देवा कोकाटे याच्यासह दोघांना रात्री उशिरा अटक केली आहे.