Karmala : पहलगाम हल्ल्याच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवणारा अटकेत; करमाळा तालुक्यात खळबळ, समर्थनार्थ कृत्यामुळे सर्वत्र चीड
अझर शेख यांनी ठेवलेल्या स्टेट्समुळे सामाजिक भावना दुखावल्या असून, त्यामुळे जातीयतेढ निर्माण झाली आहे. त्याच्या विरोधात करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुशीलकुमार पाखरे करत आहेत.
"Controversy Unfolds in Karmala Taluka as Man Arrested for Supporting Pahalgam Attack on Social Media"Sakal
करमाळा : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या समर्थनार्थ मोबाईलला स्टेट्स ठेवणाऱ्या एक जणाविरुद्ध करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने करमाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.