मित्रासोबत मटणाची पार्टी ठरली घाताची ! कासारी येथे ट्रॅक्‍टरचा नांगर अंगावर गेल्याने तरुणाचा मृत्यू

At Kasari, a young man died when the plow of a tractor hit him
At Kasari, a young man died when the plow of a tractor hit him
Updated on

वैराग (सोलापूर) : मित्रासोबत केलेली मटणाची पार्टी घाताची ठरली. कासारी (ता.बार्शी) येथे ट्रॅंक्‍टरचा नांगर अंगावर गेल्याने एका तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. पुणेवरून गावी आल्यावर मित्रासोबत मटणाच्या पार्टीचा बेत केलेल्या एका मित्रास आपला जीव गमवावा लागला. राहुल जगताप असे मयत झालेल्या तरूणाचे नाव असून जखमी अवस्थेत तुळजापुर येथील दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेल्याने रात्री उशिरापर्यंत वैराग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता. 

याबाबत अधिक माहिती अशी, बार्शी तालुक्‍यातील कासारी येथे मयत राहुल सुर्यभान जगताप (वय 30) हा पुण्यावरून आपल्या गावी आला होता. त्याच्या मित्रांनी शुक्रवारी (25 डिसेंबर) रोजी मटनाच्या पार्टीचा बेत आखला. मात्र शुक्रवारी एकादशी असल्यामुळे राहुलच्या घरच्यांनी त्यांस पार्टीस जाण्यास विरोध केला होता. तरीही राहुल मित्राच्या आग्रहाखातर गेला. त्याच्या चार मित्रांनी शेतात जाऊन पार्टी केली. पण एकादशीमुळे रात्री बाराच्या नंतर सर्वांनी जेवण केले. त्यांनंतर रात्रीतच ट्रॅक्‍टरच्या साह्याने शेत नांगरणीचे काम चालू केले. 

दरम्यान, राहुल ही ट्रॅक्‍टरच्या मागील बाजूस आला व अचानक त्याच्या अंगावर नांगर गेला. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्यास तुळजापुर येथील दवाखान्यात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. झालेल्या प्रकारात मयताच्या मोबाईलमधील फोन डिटेल्स डाटा डिलीट झाल्याचे दिसून आल्याने मटणाच्या पार्टीत घात कि अपघात या तर्कवितर्काचा शोध पोलिसांना करावा लागणार आहे. वैराग पोलिसात अद्याप या घटनेची नोंद झाली नाही. या घटनेची नोंद करून अधिक तपास जलदरित्या केला जाईल, असे पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com