केगाव- हत्तूर बायपास शुक्रवारपासून होणार वाहतुकीस खुला

गेल्या दीड वर्षापासून केगाव- हत्तूर या 23 किमीच्या बायपास रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. बायपासमुळे सुपरफास्ट महामार्ग वाहनधारकांसाठी शुक्रवारपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
Kegav-Hattur Bypass Road
Kegav-Hattur Bypass RoadSakal
Summary

गेल्या दीड वर्षापासून केगाव- हत्तूर या 23 किमीच्या बायपास रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. बायपासमुळे सुपरफास्ट महामार्ग वाहनधारकांसाठी शुक्रवारपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

सोलापूर - गेल्या दीड वर्षापासून केगाव- हत्तूर (Kegav-Hattur) या 23 किमीच्या बायपास रस्त्याचे (Bypass Road) काम पूर्ण झाले आहे. बायपासमुळे सुपरफास्ट महामार्ग वाहनधारकांसाठी शुक्रवारपासून (ता. 25) वाहतुकीसाठी (Transport) खुला होणार आहे. यामुळे शहरातील महामार्गावरील वाहतकीचा भारदेखील कमी होणार आहे.

पुण्याकडून विजापूरकडे जाणारी जड वाहने शहरातून जात होती. त्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. 23 किमीचा बायपास सोलापूर शहराच्या बाहेरून जात असल्याने शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्‍न सुटणार आहे. सोलापूर शहरातील जड वाहतूक बंद व्हावी. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि विनाअडथळा वाहतूक सुरू रहावी याहेतूने केगाव- हत्तूर बायपास रस्ता सोलापूर शहरापासून 8 किमी अंतरावरून करण्यात आला आहे. त्यामुळे आता विजापूरकडे जाणारी वाहने शहरात न येता थेट केगाव- हत्तूरमार्गे विजापूरकडे जाणार आहेत. विजापूरकडे जाणारी जडवाहतूक ही आता न थांबता नियमितपणे सुरू राहणार आहे. त्याच्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटणार असून, अपघातांवर नियंत्रण येणार आहे. सोलापूर- पुणे या महामार्गावर आणि रेल्वे पुलावर गर्डर टाकण्यासाठी वेळ लागला असून, या कामाच्या लोकार्पणाला वेळ लागला आहे. परंतु, शुक्रवारी (ता.25) स्थानिक अधिकाऱ्यांकडून बायपास खुला केला जाणार असून, मार्च महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत औपचारीकपणे लोकार्पण होणार असल्याचे सांगण्यात आले.

Kegav-Hattur Bypass Road
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला शरद पवारांच्या हस्ते मुहूर्त

ठळक बाबी...

- बायपासच्या कामासाठी लागला 15 महिन्यांचा कालावधी

- बायपासची एकूण लांबी 23 किमी

- केगाव ते हत्तूरपर्यंत जोडण्यात आला बायपास

- बायपासचे काम मे. विजयपुरा टोलवे प्रा. लि. कंपनीकडून पूर्ण

- 880 टनांचे 10 गर्डर टाकण्याचे काम यशस्वी

प्रसिद्धी आणि प्रचारावर जोर

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते केगाव- हत्तूर बायपासचे लोकार्पण मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे यावेळी सूत्रांनी सांगितले. केंद्रातील भाजप सरकारच्या निधीतून महाराष्ट्रात झालेल्या प्रत्येक कामाचे लोकार्पण व उद्‌घाटन केंद्रीय मंत्र्यांच्या हस्तेच केले जात आहे. प्रत्यक्षात उपस्थित राहता येत नसले तरीही ऑनलाइन पद्धतीने ते या कार्यक्रमास उपस्थित राहत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्याचा प्रचार व प्रसिद्धी करतात. ठाणे ते दिवा या रेल्वे मार्गाच्या लोकार्पण सोहळ्यावेळीही असेच पहायचा मिळाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com