

-भारत नागणे
पंढरपूर : जिद्द आणि प्राण्यांवर असलेल्या प्रेमातून माणसाचे नशीब कसे बदलू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे पंढरपूर तालुक्यातील रोपळे गावचे गणपत खपाले. कधी काळी टेम्पो चालवून उदरनिर्वाह करणारे खपाले आज ‘सोन्या’ नावाच्या जातिवंत खिलार वळूमुळे करोडपती झाले आहेत. या व्यवसायामुळे खपाले कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम बनले आहे. गावात तब्बल एक कोटी रुपये खर्च करून आलिशान बंगल्याचे बांधकामही सुरू केले आहे.