
उ.सोलापूर : शेतकऱ्याची उन्हाळी कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. १५ जूनपासून कृत्तिका नक्षत्राला सुरुवात होणार आहे. खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू आहे. मात्र गेल्या दोन वर्षात हमीभावापेक्षा कमी दामात विकावे लागलेले सोयाबीन, अपेक्षित दर न मिळालेल्या तुरी, उडीद या पैकी कुठल्या पिकाचा पेरा करावा? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.