
खिलार खोंडाची १२ लाखांना मागणी; विक्रीस शेतकर्याची मनाई
कोळा - सांगोला तालुक्यातील महालक्ष्मी यात्रेमध्ये भरविण्यात आलेल्या खिलार जनावराच्या बाजारात कोठ्यावधी रुपयाची उलाढाल झाली. यामध्ये लहान खोंडाना व्यपारी वर्गातून मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली. या बाजारात नितीन देशमुख यांच्या १३ महिन्याच्या खोंडाला १२ लाख रूपये किमतीत मागणी झाली. मात्र त्यांनी आपले खोंड विकले नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर तीन वर्षानंतर खिलार जानावराचा बाजार भरला होता. यामध्ये सोलापूर, पंढरपूर, सांगली, पुणे, सातारा, अहमदनगर आदी भागातून पाच हजार खिलार जनावरे दाखल झाली होती. वळूपालक नितीन देशमुख यांच्या १३ महिन्याच्या खोंडाला १२ लाखाची मागणी झाली आहे. मात्र त्यांनी आपले खोंड विक्री केले नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रदर्शनासाठी आपण हे खोंड ठेवले असल्याचे नितीन देशमुख यांनी सांगितले. तर बिरा सरगर यांची कपिला बैल जोडी या यात्रेमधील प्रमुख आकर्षण ठरली.
बैलगाडा शर्यतीवर बंदी उठल्यामुळे खिलार खोंडाची व खिलार जोड्यांची विक्री मोठया प्रमाणात झाल्याचे व्यापारी वर्गातून सांगण्यात आले., यावेळी खिलार जनावरे खरेदी करण्यासाठी व्यापारी वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यात्रा कमिटीच्या वतीने जनावर बाजाराचे व्यवस्थित नियोजन केले होते तर पिण्याच्या पाण्याचीही सोय मोफत केली होती. बाजारामध्ये जनावरासाठी लागणारे कासरे, वेसण, झुल आदीनी दुकाने सजली होती.