esakal | बळीराजासाठी आनंदाची बातमी! शेतमाल वाहतुकीसाठी किसान रेल; पहिल्याच दिवशी 'एवढा' शेतमाल बिहारला रवाना 
sakal

बोलून बातमी शोधा

2kisan_rail - Copy.jpg

शेतकऱ्यांनी घ्यावा लाभ 
लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना त्यांच्याकडील नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी अडचणी येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर रेल्वेने किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतमाल देशभरात पोहच करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. सोलापूर विभागातून पहिल्याच दिवशी 70 टन शेतमाल बिहार राज्यात पाठविण्यात आला. या सेवेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.   

बळीराजासाठी आनंदाची बातमी! शेतमाल वाहतुकीसाठी किसान रेल; पहिल्याच दिवशी 'एवढा' शेतमाल बिहारला रवाना 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : किसान रेलच्या माध्यमातून नाशवंत शेतमाल किमान वाहतूक दरात, कमी वेळेत आणि सुरक्षितपणे परराज्यात रवाना होऊ लागला आहे. किसान पार्सल एक्‍सप्रेस शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरली असून फळे व भाजीपाला वाहतूक त्यातून केली जात आहे. कोरोनाच्या संकटातही ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल, असा विश्‍वास रेल्वे प्रशासनाने व्यक्‍त केला आहे.

पहिल्या दिवशी (शुक्रवारी) कोल्हापूर ते मुजफ्फरपूर ही किसान रेल एक्‍सप्रेस रवाना झाली. सोलापूर विभागातील सांगोला, दौंड, बेलवंडी, नगर आणि बेलापूर या रेल्वे स्थानकांवरून पार्सल (शेतमाल) लोडिंग करण्यात आली. या लोडिंगमध्ये डाळिंब, शिमला मिरची, सीताफळ, नारळाची रोपे, लिंबू या शेतमालासह दुचाकींचाही समोवश असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. पहिल्याच दिवशी एकूण 70.2 टन वजनाचा शेतमाल रवाना झाल्याचेही सांगण्यात आले. त्यातून रेल्वेला तीन लाख 32 हजार 540 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सोलापूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता, अव्वर विभागीय रेल्वे व्यवस्थापक व्ही. के. नागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही पहिली किसान रेल्वे बिहार, दानापूर, मुजफ्फरपूरला रवाना झाली. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदिप हिरडे यांनी किसान रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आवश्‍यक त्या सूचना केल्या.

शेतकऱ्यांनी घ्यावा लाभ
लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना त्यांच्याकडील नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी अडचणी येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर रेल्वेने किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतमाल देशभरात पोहच करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. सोलापूर विभागातून पहिल्याच दिवशी 70 टन शेतमाल बिहार राज्यात पाठविण्यात आला. या सेवेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

तिलाटी-अक्कलकोट सेक्‍शन दरम्यान गेट बंद 
सोलापूर, ता. 21 : सोलापूर विभागातील तिलाटी- अक्‍कलकोट सेक्‍शन येथील रेल्वेचे 61 क्रमांकाचे गेट दिनांक 24 ते 25 ऑगस्ट या काळात बंद ठेवले जाणार आहे. रेल्वे रुळाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 25 ऑगस्टच्या रात्री 12.00 वाजेपर्यत हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अन्य मार्गाचा वाहतुकीसाठी वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

loading image
go to top