

Kolya Mahadev Temple Famous for Nandi Shivling Becomes a Spiritual Attraction With Its Unique Hemadpanthi Architecture
sakal
कोळा: नंदीच्या पाठीवर बसवलेली शिवपिंडी ही अत्यंत दुर्मिळ रचना असलेली वैशिष्ट्यपूर्ण शिवपिंड असलेले इतिहासप्रसिद्ध कोळा येथील प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिर सध्या श्रावणानिमित्त भाविकांचे श्रद्धास्थान ठरले आहे. अद्भुत स्थापत्यशैली अन् मंदिराच्या बाह्य भिंतींवरील वैशिष्ट्यपूर्ण कामशिल्पांमुळे ‘सोलापूर जिल्ह्याचे खजुराहो’ अशी या मंदिराची ओळख आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवपिंडीच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांची गर्दी होते.