
पांगरी : येडशी अभयारण्यातून बाहेर पडलेल्या वाघाने आता शेतशिवारात फिरून शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले करण्यास सुरवात केली आहे. मागील चार दिवसांत या वाघाने तीन वेळा हल्ले करून दोन गायी ठार केल्या, तर एका बैलाला गंभीर जखमी केले आहे. बार्शी तालुक्यातील कोरेगाव वनपरिक्षेत्रालगत ही घटना घडली आहे.