
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमार्ग : भारुडासारख्या अत्यंत लोकप्रिय व शिकण्यासाठी अवघड असलेल्या कला प्रकारामध्ये नव्या दमाची तरुण पिढी उतरली आहे. कृष्णा महाराज जोगदंड यांनी दहा कलावंतांच्या मदतीने आधुनिक वाद्यांचा वापर करत भारुड कला संच स्थापन केला आहे. वारी सोहळ्यामध्ये या संचाने तब्बल ७१ ठिकाणी दणदणीत भारुडाचे कार्यक्रम करून वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.