

Internal Dynamics Shift: Kulkarni–Deshmukh Meeting Sparks Buzz; Tadawalkar Breaks Silence
Sakal
सोलापूर : भाजपचे महापालिका निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी यांनी शनिवारी (ता. ६) आमदार देशमुखांसह शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी निवडणुकीत पक्षाची रणनीती कशी असावी, यावर चर्चा केली. मात्र, आमदार देवेंद्र कोठे हे या बैठकीस तब्येतीच्या कारणावरून अनुपस्थित होते. तर अन्य पक्षातून आलेल्या कोणत्याही नेते - कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचा पक्षाने शब्द दिला नसल्याचे भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सांगितले.