Solapur Accident : कुर्डुवाडीत मद्यधुंद तरुणाचा थरार; पोलिसांची जीप पळवून दुचाकींना दिली धडक

जीप खड्ड्यात पडल्याने टळला अनर्थ
 drunk drivers
drunk driverssakal

कुर्डुवाडी - मद्यधुंद तरुणाने कुर्डुवाडी पोलिस ठाण्यासमोर चावीसह उभी असलेली पोलिसांची सरकारी जीप चोरून नेऊन, भरधाव वेगाने दोन दुचाकींना धडक दिली. यामध्ये सुमारे सव्वातीन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ही घटना रविवारी (ता. १६) भरदिवसा दुपारी सव्वाच्या सुमारास घडली. पोलिस जीपचे चालक महमदरफीक उस्मानबाशा शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, इरफान हमीद शेख (रा. शिंदेवस्ती, हडपसर, पुणे) या मद्यधुंद तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 drunk drivers
Solapur Rain Update : मोहोळ तालुक्यात केवळ 20 टक्केच पेरणी, मोठ्या पावसाची गरज

कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदेश नाळे यांनी तपासाला जाण्यासाठी सरकारी गाडी घेऊन येण्यास फिर्यादीला सांगितले. फिर्यादी सरकारी गाडी (एमएच १३ बीक्यू ०१५९) घेऊन पोलिस ठाण्यासमोर बराच वेळ थांबले. श्री. नाळे हे पोलिस ठाण्यामधून बाहेर न आल्याने फिर्यादी हे गाडीला चावी तशीच ठेवून श्री. नाळे यांना बोलावण्याकरिता ठाणे अंमलदार कक्षासमोर जाऊन थांबले.

तेवढ्यात तिथून चालत निघालेल्या मद्यधुंद इरफान शेख याने सरकारी जीप चालू केली व माढ्याच्या दिशेने भरधाव निघाला. फिर्यादीने धावत अयशस्वी पाठलाग केला. पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे, फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने दुसरे सरकारी वाहन घेऊन पाठलाग केला.

 drunk drivers
Solapur : 'मंगळवेढ्यातील पशुधन टिकवण्यासाठी चारा छावण्या तात्काळ सुरू करा'

इरफानने भरधाव वेगाने, निष्काळजीपणे गाडी चालवून रस्त्यावरून जाणाऱ्या या दोन दुचाकींना (एमएच १४ जेसी १९७७ व एमएच १३ क्यू ७६८६) धडक दिली अन्‌ जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या बागेतील खड्ड्यात पडली. पोलिसांनी इरफान याला अटक करून क्रेनच्या साहाय्याने जीप खड्ड्याच्या बाहेर काढली. यामध्ये जीपचे सुमारे तीन लाख व दुचाकींचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेच्या तपासासाठी फिंगर प्रिंट पथक मागवण्यात आले. प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल व प्रभारी पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली.

 drunk drivers
Solapur : 'बेकरीजन्य पदार्थ व फास्ट फूड रोखण्याचा प्रयत्न'; ZP च्या शाळेत टिफीन मॉनेटर

दैव बलवत्तर; अन्यथा...

मद्यधुंद इरफानने पोलिसांची जीप इतकी भरधाव चालवली, की दोन दुचाकींना धडक दिल्याचा भयंकर थरार नागरिकांनी पाहिला. माढा रस्त्यावर जड वाहनांसह इतर वाहनेही मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. मात्र सुदैवाने या रस्त्यावरील नागरिकांचे दैव बलवत्तर म्हणून दोन दुचाकींना धडकून जीप खड्ड्यात पडल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. ही थरारक घटना चर्चेचा विषय ठरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com