Solapur : 'मंगळवेढ्यातील पशुधन टिकवण्यासाठी चारा छावण्या तात्काळ सुरू करा'

दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या मंगळवेढा तालुक्यामध्ये अलीकडे शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे लोकांचा कल वाढला.
Solapur
SolapurSakal
Updated on

मंगळवेढा - सकाळ वृत्तसेवा तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्यामुळे हिरव्या चाऱ्यासाठी पशुधन संकटात सापडले आहे म्हणून संकटातील पशुधन जतन करण्यासाठी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात यावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मुज्जमील काझी यांनी केली.

Solapur
Solapur Crime : पोलीस अधिकारी नयोमी साटम यांचा कारवाईचा धडाका, मटका व जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई

दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या मंगळवेढा तालुक्यामध्ये अलीकडे शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे लोकांचा कल वाढला. तालुक्यामध्ये हटसन, सोनाई ,नेचर, गोदरेज,पारस सह्याद्री, जिल्हा दूध संघ व इतर काही खासगी दूध संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दूध संकलन केले जाते व शेतकऱ्यांना दर दहा दिवसाला पैसे बँक खात्यावर जमा होत असल्यामुळे दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला.

Solapur
Mumbai : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील उपाययोजनेचा बोजवारा; जानेवारी ते जून दरम्यान एकूण ७० अपघातामध्ये ३७ मृत्यू

परंतु यंदाच्या हंगामात दमदार पावसाची हजेरी नसल्यामुळे हा व्यवसाय संकटात सापडला.हे पशुधन जतन करण्यासाठी सध्या हिरवा चारा म्हणून उसाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे त्यामुळे त्याचा परिणाम देखील तालुक्यातील चार साखर कारखान्यावर जाणवणार आहे.दुधाचे कमी झालेला दर पशुधनात टिकवण्यासाठी महागडा चारा आणि पशुखाद्य याचे गणित जुळवताना पशुपालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले.सध्या पशुखाद्याच्या किमती देखील गगनाला भिडल्या आहेत.

Solapur
Mumbai मध्य रेल्वेचे सौर ऊर्जेवर भर; मोकळ्या २६९४ एकर जागेपैकी उभारणार सोलर प्लांट

निश्चित किंमत नसलेली पोती बाजारात हव्या त्या किमतीने विकले जात आहेत.पशुखाद्याच्या निश्चित किंमत ठेवण्याची गरज आहे मात्र पशुखाद्य कंपन्याने वारी माफ दराने दुधात वाढ होणार या आशेवर पशुखाद्य पशुपालकाच्या माथी मारले जात आहे.पाऊस लांबल्याने काही पशु पालकांनी आपली जनावरे सांगोला व इतर बाजारात मिळेल त्या किमतीस विकण्यास सपाटा लावला आहे मात्र हे पशुपाल पशुधन टिकवण्यासाठी शासनाने वेळीच मदत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी शहराध्यक्ष मुज्जमिल काझी यांनी व्यक्त केली.

सध्या राज्यातील सत्ताधारी आपली सत्ता टिकवण्यासाठी व्यस्त आहेत पण सत्ताधाऱ्याच्या सत्तेच्या राजकारणात दुष्काळी तालुक्यातील पशुपालकाचे पशुधन संकट आल्यामुळे या अधिवेशनात चारा छावण्या सुरू करण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी करताना मागील चारा छावणी चालकाचे थकीत रक्कम देखील देण्याची मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com