कुर्डुवाडीचा माऊली कोकाटे सिद्धेश्वर केसरी चा मानकरी....! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mauli Kokate

सिद्धेश्वर केसरी चषक कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमाकांची कुस्ती माउली कोकाटे याने सरकोलीचा संतोष जगताप 20 मिनीटांत लपेट डावावर आसमान दाखवले.

कुर्डुवाडीचा माऊली कोकाटे सिद्धेश्वर केसरी चा मानकरी....!

ब्रह्मपुरी - माचणुर (ता. मंगलवेढा) येथील महाशिवरात्री निमित्त श्री सिद्धेश्वर आखाड्यात यात्रा (Siddheshwar Yatra) समितीने आयोजित केलेल्या सिद्धेश्वर केसरी (Siddheshwar Kesari) चषक कुस्ती स्पर्धेत (Wrestling Competition) प्रथम क्रमाकांची कुस्ती माउली कोकाटे (Mauli Kokate) याने सरकोलीचा संतोष जगताप 20 मिनीटांत लपेट डावावर आसमान दाखवले.

गुरुवार (ता. 03) दुपारी दोन वाजता कुस्ती फडाच्या उद्घाटन दामाजी शुगर चे संचालक राजीव बाबर, आबासाहेब डोके, जनार्दन शिवशरण, प्रकाश डोके, उमेश डोके, लिंबाजी डोके यांच्या हस्ते झाले. यात्रा समितीतर्फे माउली कोकाटे एक लाख रुपयांचे पारितोषिक आणि सिद्धेश्वर चषक देण्यात आला. यावेळी मोठ्या संखेने कुस्ती शौकीन, अनेक मल्ल व कुस्ती क्षेत्रातील नामवंत मार्गदर्शक उपस्थित होते. प्रथम क्रमाकांच्या अटीतटीच्या लडतीस कुस्तीला सुरुवात होतास शांततेने बारीक नजरा करत लपेट डावावर कुर्डुवाडी चा माउली कोकाटे यानें सरकोलीच्या संतोष जगताप यास चितपट केले. यावेळी शांततेने कुस्ती शौक़ीनानी विजयी मल्लास दाद दिली.

माचणुर येथील सिद्धेश्वर कुस्ती आखाड्यात द्वितीय क्रमांकाची कुस्ती 75 हजारांची कुस्ती विजय मांडवे यांनी दयानंद घोडके यास चितपट केले. तृतीय क्रमांकाची 51 हजारांची कुस्ती मंगळवेढ्याच्या सिद्धनाथ ओमने यांनी काही मिनीटात घुटना डावावर मेघनाथ शिंदे याला चितपट केले.चार क्रमांकाची 25 हजाराची कुस्ती मंगळवेढ्याचा दिग्विजय वाकडे यांनी संतोष केदार यास चितपट केले .पाच क्रमांकाची 25 हजाराची कुस्ती परमेश्वर गाडे यांनी घुटाना डावावर उदयसिंह खांडेकर यास चितपट केले. सहा क्रमांकाची 21 हजारांची कुस्ती बठाण एकनाथ बेदरे व गणेश चव्हाण यांच्यात जोडीवर सोडवली.

हेही वाचा: सोलापूर : सलगर बुद्रुक गावासह सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

या मैदानात माळशिरस, अकलूज, कुर्डवाडी, सोलापूर, खवासपुर, मंगळवेढा, मोहोळ, आटपाडी, कोल्हापुर, इंदापूर, पंढरपुर या ठिकाणच्या व्यायामशाळेतील मल्लाचा सहभाग होता. प्रथमच आखाड्यात कुस्ती शौकिनानी गर्दी केली होती. तसेच, कुस्ती मैदानाचे नेटके नियोजन केले होते. यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार यात्रा समिती कडून राजीव बाबर, प्रकाश डोके, उपसरपंच उमेश डोके, जनार्दन शिवशरण, आबासाहेब डोके, लिंबाजी डोके, समाधान डोके, अजित मोहिते, विलास डोके यांच्या हस्ते करण्यात आला.

मैदानात 200 हुन अधिक कुस्त्या झाल्या. रात्री उशीर पर्यंत मैदानमधे कुसत्या चालल्या होत्या त्याला कुस्तीशौकिनांनी गर्दी केली होती. उत्कृष्ट कुस्ती निवेदक म्हणून धनाजी मदने, पंच म्हणून महेंद्र देवकते, मारुती वाकडे, महाराष्ट्र केसरी समाधान घोडके, संजय शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी सुनील पाटील, जनार्दन शिवशरण, बबन सरवले, विजयसिंह पाटील, आबासो डोके, एकनाथ डोके, विष्णुपंत डोके, संजय शिंदे, पै. महेंद्र देवकते, पै. एकनाथ बेदरे, मारुती वाकडे, भाऊसाहेब पवार, पै. सत्यवान घोडके, एकनाथ डोके, धनाजी डोके, समाधान डोके, अरविंद नांदे,नितीन डोके, नितीन पाटील, सुखदेव कलुबर्मे, महादेव डोके, कुमार सरवले, सचिन पाटील, एकनाथ बेदरे, अतुल डोके, बाळासाहेब जामदार, दिलीप कलुबर्मे व परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Kurduwadi Mauli Kokate Siddheshwar Kesari Wrestling Competition

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..