

Alumni of Kurmdas Vidyamandir donate four CCTV cameras
sakal
लऊळ (ता-माढा, जिल्हा सोलापूर) : गावाशी आणि शाळेशी असलेले नाते जपत श्री कुर्मदास विद्यामंदिर, लऊळ येथील इ. दहावी (१९९६-९७) च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला चार सीसीटीव्ही कॅमेरे सप्रेम भेट देत सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. या उपक्रमामुळे शाळेच्या सुरक्षाव्यवस्थेत भर पडणार असून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व अनुशासित वातावरण निर्माण होणार आहे.