Solapur : आता लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची पडताळणी हाेणार; एप्रिल महिन्याच्या लाभाची प्रतीक्षाच, समाेर आले माेठे अपडेट..

दोन महिन्यांत राज्यातील दोन कोटींहून अधिक महिलांनी या या योजनेच्या लाभासाठी अर्ज केले. पण, अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आल्याने सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण आला आणि अन्य योजनांचा बराच निधी या योजनेसाठी वळता करावा लागला.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanasakal
Updated on

सोलापूर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार चारचाकी कार असलेल्या लाडक्या बहिणींसह एकापेक्षा अधिक वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा शोध घेण्यात आला आहे. आता पुढच्या टप्प्यात वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार आहे. त्यानुसार अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com