

Fake Ladki Bahin eKYC Messages Trigger Rush Among Women
esakal
मंगळवेढा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या ३१ मार्चपासून ही प्रक्रिया तांत्रिक कारणास्तव बंद असतानाही, कालपासून सोशल मीडियावर 'केवायसी सुरू झाल्याचे दिशाभूल करणारे संदेश व्हायरल होत आहेत. या अफवांमुळे परिसरातील थमहिलांची मोठी पळापळ होत असून, महिला व बालविकास विभागाने या वृत्ताला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा दिला नाही.