Ladki Bahin YojanaESakal
सोलापूर
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना पोर्टल बंद, नव्याने पात्र महिला लाभापासून वंचित
Government Scheme: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पोर्टल गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्यामुळे योजनेत नव्याने पात्र असणाऱ्या महिला लाभापासून वंचित राहिल्या आहेत. आम्ही लाडक्या बहिणी नाही का?असा सवाल महिला करत आहेत.
मंगळवेढा : विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पोर्टल गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्यामुळे या योजनेत नव्याने पात्र असणाऱ्या महिला लाभापासून वंचित राहिल्याने आम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी नाहीत का? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित करू लागल्या.

