लेडी सिंघमची 'तेजस्वी' कामगिरी! राज्यपालांच्या हस्ते मिळणार 'नवभारत' पुरस्कार | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते
लेडी सिंघमची 'तेजस्वी' कामगिरी! राज्यपालांच्या हस्ते मिळणार 'नवभारत' पुरस्कार

लेडी सिंघमची 'तेजस्वी' कामगिरी! राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान

सोलापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांना महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांच्या हस्ते 'नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड'ने (Navbharat Governance Award) गौरविण्यात येणार आहे. शनिवारी (ता. 20) मुंबईतील राजभवनात सायंकाळी पाच वाजता हा पुरस्कार सोहळा होणार असून, राज्यपाल कोश्‍यारी यांच्या हस्ते तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचाही समावेश आहे.

हेही वाचा: 'उजनी'वर परदेशी पाहुण्यांची वर्दळ! फ्लेमिंगोचेही आगमन

तेजस्वी सातपुते यांनी ऑक्‍टोबर 2020 मध्ये सोलापूर जिल्ह्याच्या एसपी म्हणून पदभार घेतला. कोरोनाच्या दुसऱ्या लॉकडाउनमध्ये जिल्ह्यात पोलिस प्रशासनाने अतिशय उत्तम काम केले. स्वतः तेजस्वी सातपुते या कोरोनाबाधित झाल्या; मात्र 'वर्क फ्रॉम होम'द्वारे त्यांनी शासकीय सेवा सुरूच ठेवली . सोलापूर जिल्ह्यात काम करताना पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या 'ऑपरेशन परिवर्तन'ने अनेकांना अवैध धंद्यांपासून दूर करून स्वतःच्या चांगल्या व्यवसायाकडे वळवले, याची राज्यभरात चर्चा आहे. विशेष करून हातभट्टी दारू गाळणाऱ्यांचे परिवर्तन झाले.

हेही वाचा: तुम्हाला OK या शब्दाचा अर्थ किंवा फुलफॉर्म माहिती आहे का?

ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे गावे झाली सुरक्षित

कोरोनाच्या काळात व कोरोनापूर्वी ग्रामीण भागातील गुन्हेगारीच्या घटना कमी व्हाव्यात, चोरी, दरोडे होऊ नयेत, गावागावांमध्ये नागरिकांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली. या यंत्रणेच्या माध्यमातून असंख्या गावांमधील हजारो लोकांना व्हॉट्‌सऍप व मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून जोडण्यात आले. या यंत्रणेमुळे अनेक गावांमधील चोरी व दरोड्याच्या घटना रोखण्यात यश मिळाले आहे. तसेच कोरोनावरील लसीकरण यासह गावातील विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देखील या ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांना दिले जात आहेत. या प्रयोगाचे देखील राज्यभर कौतुक झाले.

loading image
go to top