'लक्ष्मी'च्या ठेवीदारांना जानेवारीत पैसे! अर्जाची मुदत 20 जानेवारी

'लक्ष्मी'च्या ठेवीदारांना जानेवारीत पैसे! 20 जानेवारीपर्यंत अर्जाची मुदत
Laxmi Bank
Laxmi BankSakal
Summary

बॅंकेकडील 75 हजार 269 ठेवीदारांनी अर्ज करणे अपेक्षित होते. परंतु, पहिल्या टप्प्यात 16 हजार 405 जणांनीच अर्ज केले.

सोलापूर : दक्षिण कसबा येथील दि लक्ष्मी को-ऑप. बॅंकेच्या (The Laxmi Co-Operative Bank) ठेवीदारांना ठेवी विमा व पतहमी महामंडळाच्या (Insurance and Credit Corporation) माध्यमातून पाच लाखांची ठेव रक्‍कम जानेवारी 2022 मध्ये दिली जाणार आहे. बॅंकेकडील 75 हजार 269 ठेवीदारांनी अर्ज करणे अपेक्षित होते. परंतु, पहिल्या टप्प्यात 16 हजार 405 जणांनीच अर्ज केले. त्यांना 186 कोटी रुपये वितरीत केले जातील, अशी माहिती प्रशासकीय मंडळाचे प्रमुख तथा शहर उपनिबंधक नागनाथ कंजेरी (Nagnath Kanjeri) यांनी दिली. (Lakshmi Bank depositors will get the money in January 2022)

Laxmi Bank
बेशिस्त वाहनचालकांसाठी नवे दंड! 3 जानेवारीनंतर जागेवरच कारवाई

बड्या थकबाकीदारांकडील वाढलेली थकबाकी आणि कोरोनामुळे (Covid-19) वसुलीवर झालेला परिणाम, नफ्यातून बॅंकेने 'एनपीए'मध्ये केलेली 100 टक्‍के तरतूद, या प्रमुख कारणांमुळे लक्ष्मी बॅंक अडचणीत आली. ठेवीदारांच्या हक्‍काचे पैसे देणेही बॅंकेला मुश्‍कील झाले. रिझर्व्ह बॅंकेच्या (Reserve Bank Of India) आदेशानुसार बॅंकेवर प्रशासकीय मंडळ नियुक्‍त झाले. शहर उपनिबंधक कंजेरी यांच्या नेतृत्वाखाली एका सहायक उपनिबंधकांचाही त्यात समावेश आहे. त्यांनी सुरवातीला ठेवीदारांची रक्‍कम परत मिळवून देण्यासाठी कार्यवाही सुरू केली. नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत पाच लाखांपर्यंतच्या सर्वच ठेवीदारांनी अर्ज करावेत, जेणेकरून त्यांना नववर्षाच्या सुरवातीलाच पाच लाख रुपये मिळतील, असा विश्‍वास कंजेरी यांनी दिला. तरीही, 58 हजार 864 ठेवीदारांनी बॅंकेकडे अर्जच केले नाहीत. आता त्यांना पुन्हा मुदतवाढ देऊन त्यांच्याकडून अर्ज भरून घेतले जाणार आहेत.

3 ते 20 जानेवारीपर्यंत करा अर्ज

लक्ष्मी बॅंकेचे एकूण 75 हजार 269 ठेवीदार असून त्यामध्ये पाच लाखांहून अधिक ठेव असलेले ठेवीदार अवघे 558 आहेत. 75 हजार 269 ठेवीदारांना ठेवी विमा व पतहमी महामंडळाकडून त्यांची रक्‍कम परत मिळणार आहे. त्यासाठी महामंडळाकडे मुदतीत अर्ज पाठविणे आवश्‍यक आहे. पहिल्या टप्प्यात चार ते पाच लाखांपर्यंत ठेव असलेल्या बहुतेक ठेवीदारांनी अर्ज केले. परंतु, 58 हजार 864 ठेवीदारांनी अद्याप अर्ज केलेले नाहीत. त्यांच्यासाठी 3 ते 20 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली जाणार आहे. दुसरीकडे, पाच लाखांवरील ठेवीदारांना थकबाकीदारांकडील वसूल झालेल्या रकमेतून पैसे दिले जातील, असेही कंजेरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

Laxmi Bank
ड्रेनेजमध्ये गुदमरून चौघांचा मृत्यू! कलम वाढवून 'ACP' करणार तपास

लक्ष्मी बॅंक वाचविण्यासाठी थकबाकीदारांनी भरावी बाकी

लक्ष्मी बॅंकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मंगळवारी (ता. 28) नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये (Nagesh Karjagi Orchid School) कामगार नेते कुमार करजगी (Kumar Karajagi), डॉ. सतीश वळसंकर (Dr. Santosh Valsangkar) यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. यावेळी बॅंकेचे माजी संचालक कमलाकर कुलकर्णी, विष्णू मोंढे, अजय पोन्नम, विजय जाधव, मधुकर जैन, विश्‍वेंद्र मोरे, दिलीप पोटाबत्ती, शावरू राठोड, योगेश मार्गम, दिलीप कुलकर्णी, प्रवीण मुसपेठ, विजय चिंता आदी उपस्थित होते. लक्ष्मी बॅंक बड्या थकबाकीदारांकडे मोठी थकबाकी असल्याने अडचणीत वाढ झाली. उद्योग, शिक्षणासाठी बॅंकेने अर्थसहाय केल्याने अनेकांची मुले चांगल्या पदावर नोकरीला लागली. आता बॅंक अडचणीत असताना त्या थकबाकीदारांनी थकबाकी भरून बॅंक वाचवावी, असे आवाहन या बैठकीत सर्वांनीच केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com