
सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजनेतून ग्रामीण भागातील ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही, ज्यांना राहण्यासाठी जागाही नाही आणि घरही नाही, अशा जवळपास चार हजार लाभार्थ्यांना आता ग्रामपंचायतीकडून एक रुपया चौरस फूट या नाममात्र दराने ५०० चौरस फूट जागा दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील लॅण्ड बँक साकारली जात आहे.