Solapur Crime: माढा तालुका हादरला! 'मुंगशीत शेतीच्या वहिवाटीवरून आईचा खून'; मुलगा, सून, व्याहीवर गुन्हा दाखल
मृताचा मुलगा दत्तात्रय व सून रजनी मुंगशी येथे राहात असून सुनेशी पटत नसल्याने शोभा मुलाच्या घराशेजारी पत्र्याच्या खोलीत राहात होत्या. शेतीच्या वहिवाटीवरून आई, मुलगा आणि सून यांच्यात वारंवार वाद होत असत.
Police at the scene in Mungshi village after a mother was murdered over an agricultural land dispute.Sakal
कुर्डुवाडी : मुंगशी (ता. माढा) येथे शेतातील उसाच्या सरीत वहिवाटीच्या कारणावरून आईचा मुलगा, सून व व्याही या तिघांनी संगनमताने खून केल्याची घटना शुक्रवारी (ता. ३०) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.