
सोलापूर : पोखरापूर येथील लेंगरे यांच्या कुटुंबीयांची वडिलोपार्जित शेतजमीन नरुटे यांनी काही वर्षांपूर्वी घेतली. पण जमीन वहिवाटीसाठी विरोध होत असल्याने दोन गटात राडा सुरू आहे. या प्रकरणी यशवंत सोमा नरुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १८ जणांविरुद्ध मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दुसरीकडे अनंत यशवंत नरुटे यांच्या फिर्यादीवरून १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यातील वाद पोलिसांनी मिटवूनही दोन गटात भांडण सुरूच आहे.