'परदेशी पाहुण्यांची' खुलेआम शिकार! यांचे रक्षण करणार कोण?

'परदेशी पाहुण्यांची' खुलेआम शिकार! यांचे रक्षण करणार कोण?
'परदेशी पाहुण्यांची' खुलेआम शिकार! यांचे रक्षण करणार कोण?
'परदेशी पाहुण्यांची' खुलेआम शिकार! यांचे रक्षण करणार कोण?Sakal
Summary

हिवाळा ऋतूची चाहूल लागताच उजनी जलाशयात विविध पक्ष्यांचे आगमन होऊ लागले आहे.

केत्तूर (सोलापूर) : हिवाळा (Winter) ऋतूची चाहूल लागताच उजनी (Ujani Dam) जलाशयात विविध पक्ष्यांचे (Birds) आगमन होऊ लागले आहे. त्यामध्ये सध्या काही पक्ष्यांनी समुद्रवेलीवर अंडी घालून प्रजनन करण्यास सुरवातही केली आहे. मात्र, यावर परप्रांतीय मच्छिमार (Fisherman), ऊसतोड मजूर या पक्ष्यांची व पक्ष्यांनी घातलेल्या अंड्यांची शिकार (Hunting) करून त्यावर ताव मारत आहेत. यामुळे मुळातच पक्ष्यांचे अस्तित्व धोक्‍यात आलेले असताना, यांचे संरक्षण करणार कोण? हा कळीचा मुद्दा बनला आहे.

'परदेशी पाहुण्यांची' खुलेआम शिकार! यांचे रक्षण करणार कोण?
डिसेंबर-जानेवारीत महाविद्यालयांची ऑफलाईन परीक्षा !

उजनी जलाशयातील मासेमारीवर अद्याप प्रशासनाचा कुठलाही अंकुश राहिलेला नाही. यामुळे जिथे स्थानिक मच्छिमारांची व मासळीची कोणी सुरक्षा करू शकत नाही, तिथे पक्ष्यांचे संरक्षण करणार कोण? हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात उजनी जलाशयात विविध पक्ष्यांचे आगमन होण्यास सुरवात होते. त्यात सध्या मूळ निवासी असलेला पक्षी व लहान पाणकोंबड्यांप्रमाणे दिसत असला तरी त्याला इंग्रजीत कूट किंवा वारकरी, पाणकोंबडी या नावाने ओळखतात. सध्या या पक्ष्याने उजनी जलाशयातील विस्तीर्ण जलसाठ्यातील समुद्रवेल, कांडी गवत अशा अडचणीच्या ठिकाणी अंडी घालून प्रजनन करण्यास सुरवात केली आहे. परंतु धरण भरल्याने ऐन दिवाळीत मासळीला मागणी वाढत असल्याने या दिवसांमध्ये अनेक परप्रांतीय मच्छिमार, बाहेर गावातील मच्छिमार, बेजबाबदार पर्यटक तसेच परिसरात दाखल झालेले ऊसतोड मजूर येथील पक्ष्यांच्या अंड्यांसह पक्ष्यांना भक्ष्य बनवून शिकार करीत आहेत. यामुळे उजनी जलाशयावर दरवर्षी येणाऱ्या शेकडो विविध जातींच्या पक्ष्यांपैकी बहुतांश पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे या पक्ष्यांचे संरक्षण करणे अतिशय गरजेचे बनले आहे.

उपाययोजना कोण करणार?

सध्या राज्यात पक्षी सप्ताह सुरू आहे. वन विभागासह विविध संस्था अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. एरव्ही पक्षी, प्राणी आणि पर्यावरणाचे रक्षण करा, म्हणून लोकांना उपदेश करणारे राज्यकर्ते पक्ष्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात काय उपाययोजना राबविणार व शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना कसा लगाम लावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सध्या जलाशय परिसरात दुर्मिळ समजले जाणारे नॉदर्न शॉवलर, पाणकोंबड्या, लिटिल रिंग प्लोवर, शेकाट्या, ब्राऊन हेडेड गल, राखी बगळा अशा अनेक जातींचे पक्षी जलाशयाच्या पाणथळ व पाणगवताच्या ठिकाणी दिसून येऊ लागले आहेत. परदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून उजनी जलाशयावर गेल्या 15-20 वर्षांपासून फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी उजनीवर येतात, ते उजनीचे मुख्य आकर्षण आहे. दरवर्षी न चुकता ते हजेरी लावतात परंतु, गतवर्षी पाणीसाठा मुबलक प्रमाणावर असल्याने त्यांचे प्रमाण अल्प होते. हवामान तसेच वातावरण बदलाचा फटका आता पक्ष्यांनाही बसू लागला आहे.

वारकरी पक्षी ही बदके नसून ते पाणपक्षी आहेत. दूषित पाण्याची सरोवरे, तलाव, नद्या इत्यादी जलस्थानांवर हमखास आढळतात. जिल्ह्यातील उजनीसह इतर सर्वच पाणस्थळांवर या पक्ष्यांचा वावर पाहायला मिळतो. याचा अर्थ जिल्ह्यातील नद्यांसह सर्वच तलाव व सरोवरे दूषित झाली आहेत. प्रदूषित पाण्याचे द्योतक असलेले या पक्ष्यांचे शिकार होते, हे निंदनीय प्रकार आहे.

- डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक, अकलूज

नाना तऱ्हेच्या पक्ष्यांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या उजनी जलाशयाच्या परिसरात होणाऱ्या पक्ष्यांची शिकार थांबायला पाहिजे. पर्यावरणाच्या समतोलनात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या या घटकांचे संवर्धन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रशासन सतर्क राहायला पाहिजे. स्थानिक युवक व सामाजिक संघटनांनीही शिकाऱ्यांवर लक्ष ठेवले पाहिजे.

- राहुल वंजारी, पक्षी निरीक्षक, सोलापूर

'परदेशी पाहुण्यांची' खुलेआम शिकार! यांचे रक्षण करणार कोण?
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील बॅंकेत 27 कोटींचा अपहार!

दरवर्षी उजनी जलाशयात हजेरी लावणारे देशी- विदेशी पक्षी उजनीचे सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. या सर्वच पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी आपल्या परिसरात अवैध शिकार करणारे आढळल्यास जबाबदार निसर्गप्रेमी नागरिक म्हणून अशा गैरकृत्य करणाऱ्यांना समज द्यावी व वनविभागाच्या 1926 या क्रमांकावर माहिती द्यावी. वनविभागाने कठोर भूमिका घेत पाणथळीच्या भागात वेळोवेळी गस्त घालत शिकाऱ्यांवर अंकुश ठेवणे आवश्‍यक आहे.

- कल्याणराव साळुंके, पक्षीमित्र, करमाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com