Solapur: जीएसटी अभय योजनेची मुदत मार्च अखेर संपणार आहे. जीएसटीच्या थकबाकीदारांना अभय योजनेत लाभ घेण्याची ही शेवटची संधी आहे. सध्या या योजनेतील थकबाकीदारांकडे व्याजासह २४० कोटी रुपये जीएसटी रक्कम थकीत आहे..वर्षभरापासून जीएसटी खात्याने अभय योजना सुरू केली आहे. या योजनेत जीएसटी कर थकबाकीदारांना दंड व व्याजाच्या भुर्दंडापासून सोडवण्याची तरतूद आहे. या थकबाकीदारांनी योजनेच्या माध्यमातून जीएसटीची मूळ रक्कम भरल्यास त्यांना उर्वरित व्याज व दंड माफ केला जातो. काही महिन्यांपासून या थकबाकीदारांना अभय योजनेत सहभागी होण्याची स्मरणपत्रे दिली आहेत. यापूर्वी ज्या थकबाकीदारांनी योजनेत सहभाग घेतला त्यांना योग्य तो आर्थिक लाभ मिळवून देण्यात आला आहे..Summer Care For Children: उन्हाळ्यात लहान मुलांना घामोळ्यांपासून कसे वाचवावे? वाचा सविस्तर माहिती....मात्र आता ही योजना मार्च अखेरीस संपुष्टात येणार आहे. तरीही अनेक थकबाकीदारांनी योजनेत सहभाग घेतला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे जीएसटी कराची मुद्दलाची रक्कम थकीत आहे. सर्वाधिक कर थकवणाऱ्या थकबाकीदारांमध्ये साखर कारखाने, मोठे उद्योग, बांधकाम प्रतिष्ठाने, औषध निर्मिती उद्योग व कृषी केंद्रांचा समावेश आहे. योजना संपल्यानंतर या थकबाकीदारांचे सवलत मिळवण्याचे दरवाजे बंद होणार आहेत. तसेच त्यांच्यावर पुढील कारवाई होऊ शकते..थकबाकी अन् थकबाकीदार- अभय योजनेसाठी पात्र थकबाकीदार - ६९०- एकूण दंड व व्याज धरून थकबाकी- २४० कोटी- जीएसटी कराची थकीत मुद्दल रक्कम - १०२ कोटी ७८ लाख रुपये- मुद्दलावरील व्याजाची रक्कम- १०४ कोटी ५२ लाख रुपये- दंडाची रक्कम - २५ कोटी ९० लाख रुपये- अभय योजनेत सहभागी झाल्यास माफ होणारी रक्कम १२९ कोटी रुपये.अभय योजनेस पात्र थकबाकीदारांना स्मरणपत्रे पाठवून योजनेचा लाभ घेण्याचे सूचित केले आहे. योजनेची मुदत संपल्यानंतर कर थकबाकीबद्दलची कारवाईची प्रक्रिया नियमानुसार सुरू होणार आहे. त्यासाठी थकबाकीदारांनी योजनेबाबत जीएसटी अधिकाऱ्यांशी संवाद साधून लाभ घ्यावा.- सुधीर चेके, राज्यकर, सहआयुक्त, सोलापूर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.