Latur : आनंदाच्या शिध्यापासून तब्बल १७ गावे वंचित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur  news

Latur : आनंदाच्या शिध्यापासून तब्बल १७ गावे वंचित

शिरूर अनंतपाळ : अन्न नागरी व पुरवठा मंत्रालय सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत दिवाळीत देण्यात येणाऱ्या संचाचा बोजवारा उडाला असून या संचावर अवलंबून राहणाऱ्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील १७ गावांतील दिन दुबळ्या नागरिकांची दिवाळी कडू झाली असून दिवाळी संपून गेली तरीही शासनाचे हे धान्य किट मिळाले नाही .

हेही वाचा: Latur : कळंबमध्ये रंगली पंडित भाटे यांची ‘स्वरमैफल’

राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय योजना, अन्न सुरक्षा योजना, प्राधान्य कुटुंब व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल (शेतकरी) शिधापत्रिधारकांना दिवाळीनिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी एक किलो रवा, एक किलो हरभरा डाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेल या चार वस्तूचा संच १०० रुपयात उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

हेही वाचा: Latur : भैरवनाथ’ देणार ऊस दराची खुशखबर

या संचाचा लाभ संबंधित लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी देण्याचा त्याचा मानस होता शिरूर अनंतपाळ तालुक्यातील १७ हजार सहाशे ८६ कुटुंब ना याचा लाभ मिळणार आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली त्यामुळे दिन दुबळ्या नागरिकांची दिवाळी गोड होणार म्हणून गोर गरीब जनता या किटवर अवलंबून होती.

हेही वाचा: Latur : वीस हजार शेतकरी ‘केवायसी’

मात्र शासनाच्या या योजनेचा बोजवारा उडाला असून शिरूर अनंतपाळ तालुक्यात शिवपूर, जोगाळा, हानमंतवाडी, लक्कड जवळगा, रापका, थेरगाव, गणेशवाडी, अजनी, राणी अकुलगा व बेवनाळ, बाकली, आरी, तळेगाव बोरी, वाजरखेडा, कांबळगा या १७ गावात दिवाळी संपत आली तरीही अद्याप किट वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे दिन दुबळ्या नागरिकांची दिवाळी प्रत्यक्षात कडूच झाली. त्यामुळे याला जबाबदार कोण शासन की प्रशासन या गुत्तेदार कोणावर होणार कारवाई असा सवाल जनतेतून जनतेतून उपस्थित केला जात आहे.