Latur : कळंबमध्ये रंगली पंडित भाटे यांची ‘स्वरमैफल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur vocal concert

Latur : कळंबमध्ये रंगली पंडित भाटे यांची ‘स्वरमैफल’

कळंब : कळंब येथील कलोपासक मंडळाने स्वर्गीय कमलाकर राव जोशी यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध गायक पंडित आनंद भाटे यांची शास्त्रीय व सुगम गायन स्वरमैफल व स्वर दीपोत्सव कार्यक्रम (ता. २६) रोजी दिवाळी पाडवा भाऊबीजनिमित्त विठ्ठल मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.

हेही वाचा: Latur : वीस हजार शेतकरी ‘केवायसी’

सुरुवात सरस्वती देवी व स्वर्गीय कमलाकर जोशी यांच्या प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने झाली याप्रसंगी प्राचार्य सुनील पवार, महादेव महाराज अडसूळ, डॉ. शोभा पाटील, प्रकाश मोरे, भास्कर राव सोनवणे, यांनी दीप प्रज्वलन केले तर गायक पंडित आनंद भाटे, तबलावादक भारत कामत, संवादिनी राहुल गोळे यांचे स्वागत श्रीकांत कळंबकर, माधव कुलकर्णी, शहाजी थोरबोले यांनी केले, याप्रसंगी कलोपासक मंडळाचे यशवंत दशरथ यांनी आपल्या मनोगतात कळंब येथील शास्त्रीय व सुगम गायन रसिक श्रोत्यांसाठी आम्ही गेली पाच वर्ष कार्यक्रमाचे आयोजन करीत असून यापुढेही नामवंत गायकांना निमंत्रित करण्यात येईल असे सांगितले.

हेही वाचा: Latur : एसटीकडून कात टाकण्यास सुरवात

यानंतर पंडित आनंद भाटे यांनी आपल्या मैफिलीला सुरुवात करीत प्रसिद्ध गायक व त्यांचे गुरु पंडित भीमसेन जोशी यांचा आवडता राग रशिया. महाराजा रागाने आपल्या गायन कार्यक्रमाची सुरुवात केली अनू टाळ्याचा कडकडाट झाला आपल्या बहारदार गायनातून ही स्वर मैफिल एका विशिष्ट उंचीवर नेली व रसिक श्रोत्यांनी याला भरभरून दाद दिली.

हेही वाचा: Latur : लातूर-बार्शी महामार्गाच्या कामाला मुहूर्त कधी?

कार्यक्रमात प्रसिद्ध तबलावादक भारत कामत, यांची साथ संगत तर संवादिनी साथ राहुल गोळे यांनी केली, पंडित आनंद भाटे यांनी कार्यक्रमात प्रिया....न...बोले... तैसे... नयना तरसे ही बंदिशी सादर केली यानंतर जादू... भरेतोरे नैना रहिले.... बहुत जहरीले याला रसिक श्रोत्यांनी भर भरून दाद दिली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय शशिकांत देशमुख यांनी करून दिला.

हेही वाचा: Latur : आंतरजातीय विवाहाची सुरुवात महात्मा बसवेश्वरांनी केली

आभार डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी मानले कार्यक्रमात नवोदय विद्यालय विभागीय शास्त्रीय गायन स्पर्धेत विभागीय स्तरातून प्रथम क्रमांक आल्याबद्दल रोहित कृष्णा पांचाळ या विद्यार्थ्यांचा गायक पंडित आनंद भाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल कुलकर्णी, श्रीहरी जोशी, विलास खांडेकर, दर्शन पोरे, नरेश कुलकर्णी, मच्छिंद्र साखरे, वर्षाली देशमुख, अनिता कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा: Latur : आंतरजातीय विवाहाची सुरुवात महात्मा बसवेश्वरांनी केली

या गाण्यांचे सादरीकरण

नाट्यगीत गायनात संगीत कान्होपात्रा या नाटकातील संत ज्ञानेश्‍वराचा अवघीचा संसार... सुखाचा करीन... आनंद भरीन अभंग तसेच संत तुकाराम महाराज यांचा काय करू... होतो. जीवकासावीस हा अभंग सादर केला, बालगंधर्व चित्रपटातील व संगीत मानापमान नाटकातील मन...राम... रंग रंगीले.. तसेच पांघरून या चित्रपटातील स्नेह, प्रेम मायदीआळी तसेच इलुसा देह... किती...खोल डोह ही रचना सादर केली माझे माहेर... पंढरी... आहे हिवरे च्या तिरी लोकप्रिय अभंग गाणे श्रोते मंत्रमुग्ध झाले.