Latur : एसटीकडून कात टाकण्यास सुरवात

लातूर विभागात नव्या कोऱ्या २१ बसगाड्या दाखल
latur st bus
latur st busesakal

लातूर : कामगारांच्या दीर्घ संपासह विविध कारणांने आर्थिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) कात टाकण्यास सुरवात केली आहे. ऐन दिवाळीत प्रवाशांना गोड भेट देत महामंडळाने नव्या कोऱ्या बसगाड्या उपलब्ध करून देण्यास सुरवात केली आहे. यात लातूर विभागात शुक्रवारी (ता. २१) नव्या कोऱ्या एकेवीस बसगाड्या दाखल झाल्या. या बसगाड्यांचे उद्‌घाटन एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते करण्यात आले.

latur st bus
Latur : आतापर्यंतची सरकारे उद्योगपतींचीच; रघुनाथदादा पाटील

अंबाजोगाई रोडवरील बसस्थानक क्रमांक दोनवर या नविन परिवर्तन बसचे स्वागत करण्यात आले. परिवर्तन बसगाड्या आरामदायी असून पुशबॅक सीटच्या आहेत. आयशर कंपनीच्या या बसगाड्या असून त्या लवकरच टप्प्याटप्प्याने विभागातील विविध मार्गावर धावणार आहेत. बसगाड्यांमध्ये सर्व सवलतीधारकांना प्रवास करता येणार आहे. आरामदायी, सुखकर व सुरक्षित बसगाड्या साध्या दरात धावणार असून या बसगाड्यांचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन श्री. चन्ने यांनी या वेळी केले.

latur st bus
Latur : लातूरची बाजारपेठ साड्यांनी सजली

लागलीच या बसगाड्या गर्दी असलेल्या परभणी, उस्मानाबाद, उदगीर, सोलापूर व अंबेजोगाई आदी मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी सोडणार असल्याचे विभाग नियंत्रक अश्वजीत होनराव यांनी सांगितले. एसटी कामगारांच्या दीर्घ काळाच्या संपानंतर विविध मार्गावर धावणाऱ्या बसगाड्या सातत्याने नादुरूस्त होत असत. पावसाळ्यात तर बसगाड्या नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढले होते. अर्ध्या वाटेत बसगाड्या बंद पडल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली.

latur st bus
Latur : हासोरी ग्रामस्थांचे उपोषण सुरू

यातच नव्या कोऱ्या बसगाड्या आल्याने प्रवाशांची गैरसोय टळली आहे. उद्‌घाटनप्रसंगी वरिष्ठ सांखिकी अधिकारी (नियंत्रण समिती क्रं. दोन) बद्रिप्रसाद मांटे, विभागीय यंत्र अभियंता सेवाराम हेडाऊ, विभागीय वाहतूक अधिकारी अभय देशमुख, विभागीय वाहतूक अधीक्षक संदिप साळुंके, सुरक्षा व दक्षता अधिकारी दिपक धात्रक, कामगार अधिकारी प्रदिप सुतार, उपयंत्र अभियंता जफर कुरेशी यांच्यासह विभागातील अधिकारी, कर्मचारी व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com