पंढरपूर : महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत. मंदिर परिसरातील व्हीआयपी रस्त्यावर आणि मंदिराच्या प्रवेशदारातच फेरीवाल्यांनी अक्षरशा बाजार मांडला आहे. या बाजारामुळे विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांना त्रास सहन करावा लागतो.