
पंढरपूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यातील धनगर समाजाने विश्वास ठेवून महायुतीला मतदान केले. राज्यात देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आले, तरीपण धनगर आणि ओबीसी समाजाचे प्रश्न सुटत नाहीत. उलट समाजाची अडवणूक केली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर विश्वास ठेवून महायुतीला मतदान केले, पण त्यांनीही आमचा विश्वासघात केला अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली. लक्ष्मण हाके शनिवारी (ता. ३१) अहिल्यादेवी जयंतीच्या निमित्ताने पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना महायुतीवर निशाणा साधला.