
पंढरपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजातील सर्व घटकातील पदाधिकाऱ्यांना सत्तेमध्ये स्थान दिले आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. तरीही लक्ष्मण हाके हे समाजात जातीय विष पेरण्याचे काम करत आहेत. स्वतःला प्राध्यापक म्हणवून घेण्याची त्यांची लायकी नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केली.