या बंधाऱ्याच्या अनेक गाळ्यातील दरवाजांतून पाणी गळती होत असल्याने त्यामधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.
माळीनगर : ओझरे (तांबवे) येथील नीरा नदीवरील (Nira River) कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरू आहे. त्यामुळे जूनपर्यंत बंधाऱ्यात पाणी शिल्लक राहील की नाही, याबाबत बंधाऱ्या लगतच्या नदीपात्राच्या माळशिरस व इंदापूर तालुक्यातील बिजवडी, ओझरे, गोंदी या गावातील शेतकऱ्यांनी (Farmers) धास्ती घेतली आहे. जलसंपदा विभागाने या बंधाऱ्यातील पाणी गळती तत्काळ रोखावी, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.