
उ. सोलापूर : बाजारात लिंबाचे दर इतके घसरले की विक्री अभावी लिंबू कचऱ्यात फेकण्याची वेळ आली आहे. उच्च प्रतीच्या लिंबांना प्रति किलो अवघा दहा ते बारा रुपये इतका भाव मिळत आहे. लिंबू दर कोसळण्याचा फटका शेतकऱ्याबरोबरच व्यापाऱ्यांनाही बसला आहे. किरकोळ बाजारातही एक रुपयांना दोन लिंबू मिळत आहेत.