
सोलापूर : एरव्ही स्वयंपाक घरात जिरे, मोहरी, कोथिंबीर, हिरवी मिरची या बरोबरच चवीसाठी व उन्हाळ्यात सरबतासाठी लागणाऱ्या लिंबाच्या दरात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात एक रुपयाला मिळणारे लिंबू सध्या पाच रुपयांना एक मिळत आहे. बाजार समितीत आवक कमी झाल्याचा हा परिणाम आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.