
पांगरी : बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी शिवारात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली असून वसंत लक्ष्मण दोडमिसे या शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या रेडकावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. ही घटना शुक्रवारी (ता. ४) सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.