
सोलापूर : कुष्ठरोग वसाहतीतील घरांची जीर्ण अवस्था, कुष्ठरोग्यांची बंद झालेली पेन्शन योजना, रेशन दुकानाची दुरवस्था, कचऱ्याचे ढीग, रुग्णालयात पूर्णवेळ डॉक्टरांची अनुपस्थिती, वसाहतीमध्ये दिवाबत्तीची सोय नाही, शुद्ध पाण्याची टंचाई, रात्रीच्या वेळी टवाळखोर आणि तळीरामांचा वावर आणि रुग्णालय परिसराला वॉल कंपाउंड नसणे आदी तक्रारींचा पाढाच यावेळी नागरिकांनी वाचला. यावेळी कुष्ठरोगग्रस्तांना घरकूल योजनेतून घरे देण्याचे आश्वासन खासदार प्रणिती शिंदे यांनी आश्वासन दिले.