rana dilip suryavanshi
sakal
अक्कलकोट - देवदर्शनाला आलेल्या राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर पाठलाग करून खुनी हल्याचा प्रयत्न केल्याची घटना अक्कलकोट येथे घडली. पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे सुदैवाने राणा हे थोडक्यात बचावले. नक्षली भागात देखील राणा यांचे मोठ्या प्रमाणात काम चालू असल्याने नक्षली हल्ला नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे.