सांगोला - मी सध्या कोणत्याही पक्षाचा सदस्य नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीतील नावाबाबत सर्व चर्चा अर्थहीन आहेत. मी कोणत्या पक्षात प्रवेश करणार हा येणारा काळच ठरवेल असे स्पष्टीकरण माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केले. साळुंखे-पाटलांच्या या भूमिकेमुळे जिल्हाध्यक्ष पदाच्या त्यांच्या नावाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.