

AB forms submission begins candidate selection process.
sakal
मंगळवेढा : जिल्ह्यातील अक्कलकोट, पंढरपूर, मंगळवेढा, अनगर, दुधनी,मोहोळ, मैंदर्गी, या नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार निश्चित नंतर त्यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यावर देण्यात आली सध्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सर्वच पक्षाकडे राजकीय उठबस कायम राहावी या दृष्टिकोनातून अनेकांनी आघाडीवर निवडणुका लढवण्याचा पर्याय शोधून ठेवला होता मात्र सगळ्यात अगोदर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पक्ष वाढीसाठी त्यांच्या निवडीनंतर नेटाने काम सुरू केले.