Lok Sabha Election 2024 : मतदानावेळी ‘उत्तर’मध्ये सर्वाधिक ‘प्रश्‍न’; ९५३ जणांनी वापरला १९५० च्या हेल्पलाइनचा पर्याय

सोलापूर लोकसभेत सर्वाधिक प्रश्‍न सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात पडल्याचे हेल्पलाइन १९५० वरील आकडेवारीतून समोर आले आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Sakal

सोलापूर : सोलापूर, माढा, धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे मतदान होऊन आठवडा होऊन गेला तरीही मतदानाबद्दल उत्सुकता, निकालाबद्दलची उत्सुकता काही कमी होताना दिसत नाही. मतदान आणि निकाल यामध्ये तब्बल २६ ते २७ दिवसांचे अंतर असल्याने कोणत्या तालुक्यात कोण चालले?, कोणासाठी कोणी आतून मदत केली?

याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदार यादीतील नावाबाबत सर्वाधिक प्रश्‍न सोलापूर लोकसभा मतदारसंघात पडले होते. सोलापूर लोकसभेत सर्वाधिक प्रश्‍न सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात पडल्याचे हेल्पलाइन १९५० वरील आकडेवारीतून समोर आले आहे.

निवडणूक पारदर्शक व्हावी, निवडणूक सोपी व सुटसुटीत व्हावी यासाठी भारत निवडणूक आयोगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांसाठी विविध मार्ग उपलब्ध करून दिले होते. मतदार यादीतील प्रश्‍नांबाबत आयोगाने १९५० ही हेल्पलाइन/टोल फ्री नंबर उपलब्ध करून देण्यात आला होता.

सोलापूर लोकसभा मतारसंघात मतदानाच्या दिवशी मतदारयादीबात सर्वाधिक विचारणा सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून झाल्याचे समोर आले आहे. या मतदारसंघातील तब्बल ९५३ जणांनी या हेल्पलाइनवरून विचारणा केली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विचारणा केलेल्या १ हजार २१६ जणांमध्ये ९५३ जण सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील आहेत हे विशेष.

भारत निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नॅशनल ग्रीव्हियन्स सर्विस पोर्टल, सि-व्हिजील ॲप, कॉल सेंटर, १९५० हेल्पलाइन / टोल फ्री नंबर असे तीन पर्याय उपलब्ध करून दिले होते. मतदार यादीत नाव नसणे, मतदार यादीत नाव न मिळणे यासह मतदार यादीशी निगडित विषयांसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला होता.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात या टोल फ्री क्रमांकावर सर्वाधिक १ हजार २१६ लोकांनी विचारणा केली. त्यामध्ये सर्वाधिक ९३६ जण सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील आहेत. अक्कलकोटमधील ७१, मोहोळमधील २७, पंढरपूरमधील ७६, शहर मध्यमधील ३१, सोलापूर दक्षिणमधील ७५ जणांनी टोल फ्री क्रमांकवर मतदार यादीतील समस्यांबाबत विचारण्यात केल्याच समोर आले आहे.

माढ्यातून १७० जणांची विचारणा

मतदार यादीतील नावासंदर्भात माढा लोकसभा मतदारसंघातून १७० जणांनी १९५० या टोल फ्री क्रमांकावर विचारणा केली आहे. त्यामध्ये माळशिरसमधून सर्वाधिक ६८, सांगोल्यातून ३७, माढा विधानसभा मतदारसंघातून २३, करमाळ्यातून २५, माणमधून ८ तर फलटणमधून ९ जणांनी विचारणा केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com