प्रेमविवाहाला लागली नजर! गळा आवळून पत्नीचा खून, पतीनंही जीवन संपवलं; उळे गावातील घटना, आई-वडील किर्तनासाठी गेले अन्..
Love Marriage Ends in Horror: रविवारी रात्री त्याच्या भावासह आईवडील घरी पोहोचले असता घरातील हॉलमध्ये गायत्री ही पडली होती. तिच्या गळ्याला चार्जरचे वायर गुंडाळलेले होते. तर गोपाळ हा आतील खोलीत दरवाजासमोरच गळफास घेऊन लटकताना आढळला.
“Silence after screams — Ule village mourns as husband kills wife and dies by suicide during parents’ absence.”Sakal
सोलापूर : नवविवाहित तरुणाने चार्जरच्या वायरने गळा आवळून पत्नीचा खून केला. त्यानंतर त्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (ता. ६) रात्री ११.३० च्या सुमारास उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथे ही घटना उघडकीस आली.