आवक कमी, तरीही कांद्याला प्रतिक्विंटल १८०० रुपयांपर्यंतच भाव! अतिवृष्टी, थंडीमुळे कांद्याला काजळी; सोलापुरातून गतवर्षीपेक्षा यंदा आवक दोन पटीने घटली

सोलापूर बाजार समितीत मागील दोन महिन्यांपासून सरासरी १७० गाड्या कांदा विक्रीसाठी येत आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील कांदा अवघा २० टक्के असून बाकीचा कांदा पुणे, अहिल्यानगर, बीड आणि कर्नाटकातील विजयपूर, कलबुर्गी येथील आहे. आवक कमी असताना देखील कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी १००० ते २००० रुपयांपर्यंतच भाव मिळत आहे.
onion
Maharashtra Onion Farmers Lose Trust in Governmentesakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : येथील सोलापूर बाजार समितीत मागील दोन महिन्यांपासून सरासरी १७० गाड्या कांदा विक्रीसाठी येत आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील कांदा अवघा २० टक्के असून बाकीचा कांदा पुणे, अहिल्यानगर, बीड आणि कर्नाटकातील विजयपूर, कलबुर्गी येथील आहे. आवक कमी असताना देखील कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी १००० ते २००० रुपयांपर्यंतच भाव मिळत आहे.

दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ५०० ते ७०० गाड्या कांद्याची आवक असते. पण, यंदा अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे २० हजार हेक्टरवरील कांदा खराब झाला आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यांपासून सोलापूर बाजार समितीत येणाऱ्या कांद्यामध्ये सरासरी केवळ ४० गाड्या कांदा स्थानिक आहे. नोव्हेंबर महिन्यात नव्या कांद्याला सरासरी ११०० रुपयांवर भाव मिळालेला नाही.

तेलंगणामध्ये सोलापूरच्या कांद्याला मोठी मागणी होती. पण, आता त्या राज्यातच कांदा उत्पादन झाल्याने सोलापुरातून कांद्याची मागणी घटली आहे. दुसरीकडे कांदा निर्यात देखील बंद असल्याने भाव सुधारत नसल्याचे बाजार समितीतील अधिकारी सांगत आहेत. जानेवारीत भावात सुधारणा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘या’ कांद्याला चांगला भाव

जुना काजळी न चढलेला दणकट कांदा आणि नवा खराब न झालेला मजबूत कांदा असेल तर त्याला दोन हजार ते २३०० रुपयांपर्यंत भाव आहे. पण, सध्या बाजार समितीत येत असलेल्या कांद्यातील ६५ टक्के कांदा खराब येत असल्याचेही अधिकारी सांगतात. सततच्या पावसामुळे काढणीला आलेला कांदा शेतात तसाच राहिला. त्यामुळे आता तो कांदा खराब झाला आहे. काहीतरी पदरात पडेल म्हणून शेतकरी बाजार समितीत आणत आहेत, पण त्याला प्रतिकिलो ८ ते १० रुपयांचा भाव मिळत आहे.

सोलापूर बाजार समितीतील तीन दिवसांतील आवक

  • एकूण गाड्या

  • ४८३

  • प्रतिक्विंटल सरासरी भाव

  • १,०००

  • सर्वाधिक मिळालेला दर

  • २,६००

  • एकूण उलाढाल

  • ४.८४ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com