Lumpy Skin Disease : अखेर मोहोळ तालुक्यात 'लंपी" चा शिरकाव, साडेपाचशे पशुधन बाधित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lumpy skin disease

Lumpy Skin Disease : अखेर मोहोळ तालुक्यात 'लंपी" चा शिरकाव, साडेपाचशे पशुधन बाधित

मोहोळ : मोठ्या प्रमाणात लसीकरण होऊन ही अखेर "लंपी" ने मोहोळ तालुक्यात शिरकाव केला असून, या रोगामुळे आज पर्यंत एकूण १७ जनावरे दगावली आहेत. ५४४ जनावरे बाधित झाली असून,११ जनावरे अत्यावस्थ असल्याची माहिती मोहोळ पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय विभागाचे पशुधन विकास अधिकारी डॉ प्रदीप रणवरे यांनी दिली. यामुळे शेतकरी वर्गात घबराट पसरली असून, दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे.

लंपी ची सुरुवात माळशिरस तालुक्यातून झाली. त्यामुळे इतर तालुक्या प्रमाणे मोहोळ तालुका ही सतर्क झाला. लंपी चा प्रादुर्भाव होऊ नये या साठी मोहोळच्या पशुवैद्यकीय विभागाने लसीकरण मोहीम सुरू केली तालुक्यातील १ लाख ८ हजार ३५० जनावरांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे रोगाला थोडा अटकाव झाला. गेल्या महिन्या पासून या रोगाच्या प्रादुर्भावात पुन्हा वाढ झाली आहे. या रोगामुळे तालुक्यातील १७ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत तर ५४४ जनावरे बाधित झाली आहेत. ११ जनावरे सध्या अत्यावस्थेत आहेत.लंपी मुळे ६२ गावातील जनावरे बाधित झाली आहेत. लसीकरणाची पराकाष्टा केल्याने ६३ जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. तालुक्यातील विविध भागात १ लाख ७ हजार एवढी जनावरांची संख्या आहे.

लंपी चा आजार झाल्याने जनावरे दुधासाठी कमी येतात. अगोदरच शेतकरी विविध संकटामुळे अडचणीत आहे. ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो, मात्र दूध उत्पादनात घट होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. विशेष बाब म्हणजे मोहोळ तालुक्यातील १ लाख ७ हजार जनावरा साठी केवळ परीचरा सह २० डॉक्टर आहेत. त्यामुळे डॉक्टर लसी करणासाठी प्रत्येक ठिकाणी पोहोचणे अडचणीचे आहे. त्यांचा प्रवासात वेळ जातो. लंपी चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोविड काळात ज्याप्रमाणे क्वारंटाईन सेंटर होती त्याचप्रमाणे जनावरा साठीही त्याची गरज आहे.क्वारंटाईन सेंटर झाल्यामुळे एकाच छताखाली सर्व बाधित जनावरे येतील, त्यामुळे लवकर उपचार करणे सोयीचे होऊन मृत्यूचे प्रमाण ही घटनार आहे.

दृष्टीक्षेपात मोहोळ तालुका

एकूण जनावरांची संख्या-१लाख ७ हजार---

इपीसेंटर-१५---

बाधित गावे-६२----

बाधित पशुधन-५४४-- उपचाराने बरे झालेले पशुधन-६३---

मृत झालेले पशुधन-१७---

अत्यावस्थ पशुधन-११--- लसीकरण झालेले पशुधन-१ लाख ८ हजार---

टॅग्स :SolapuranimalVirus