
लंपी रोगांशी संबधित लक्षणे डिकसळ येथील आढळून आली असून, पशुसंवर्धन विभागाने यांचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले आहे.
मंगळवेढ्यात जनावरात लंपीची लक्षणे? तपासणीसाठी नमुने पाठवले
मंगळवेढा - पशुसंवर्धन विभागाने केलेल्या पाहणीत तालुक्यातील डिकसळ येथे लांबी सदस्य रोगाची लक्षणे जनावरात दिसून आल्याने पशुपालकांत चिंता निर्माण केलेल्या लंपीचा तालुक्यात शिरकाव झाल्याने पशुपालकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले. तालुक्यातील जनावराचे तातडीने लसीकरण करण्याची मागणी पशुपालकातून होत आहे.
याबाबत रोगांशी संबधित लक्षणे डिकसळ येथील आढळून आली असून, पशुसंवर्धन विभागाने यांचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले आहे. तुर्त जनावराचे विलगीकरण करण्यात आले. दुष्काळी तालुक्यात गेल्या दोन वर्षात कोरोना तालुक्यातील मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाय्राच्या नोकरी गदा आल्याने ग्रामीण भागात दुध धंदयाच्या पर्याय निवडला. पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या विशेषता दक्षिण भागातील अनेक गावे दुधावर तग धरुन राहिली. शिवाय अनेक तरुणांनी दुध व्यवसायात नवनवे बदल स्विकारल्याने तालुक्यात दुध धंदयात मोठया प्रमाणात वाढ झाल्याने अनेक खासगी संस्थांनी दुष्काळी तालुक्यात व्यावसायासाठी प्रवेश केला. त्यामध्ये हॅटसन, सोनाई, नेचर, डोडला, सहयाद्री, जिल्हा दुध संघ, यासह खासगी दुध संकलन केद्रे कार्यरत आहे. कोरानात दुध विक्रीत दर कपात झाली असतानाही मोठया प्रमाणात नुकसान सहन केले.
दुधापेक्षा पशुखादयाचे दर जास्त असताना देखील पशुपालकांना दुध धंदा सोडला नाही. मात्र, अलिकडच्या काळात दुध विक्रीत झालेली वाढ यामुळे दुध उत्पादकांत समाधान असताना लंपीने पशुपालकांत चिंता वाढवली. तालुक्याचा रोगाबाबत खबरदारी म्हणून जनावराचे विलगीकरण, नवीन जनावरे खरेदी न करणे, गोठयात गोवय्रा व कडूनिंबाचा धुर करण्याबाबत प्रबोधन केले. दरम्यान, जिल्हाधिकाय्रांनी आठवडा बाजारातील खरेदी विक्रीवर बंदी घातली असून, तालुक्यात जवळपास 93 हजारापेक्षा अधिक पशुधन असून शासकीय लस अदयाप उपलब्ध नसल्याने खासगीत लस विकत घेवून दयावी लागत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी नुकताच पशुधन विभागाचा आढावा घेतला. पण लस उपलब्ध करणेबाबत काय निर्णय घेतला. याची माहिती पशुपालकांना मिळाली नाही.
खबरदारी उपाय म्हणून संबंधित पशुपालकांच्या जनावराचे नुमने घेतले असून पशुपालकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही.
- सुहास सलगर तालुका पशुधन अधिकारी
तालुक्यातील मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील सर्वच जनावरांना लंबीची लस उपलब्ध करण्याबाबत करण्यासाठी यापूर्वीच पत्र दिले लस उपलब्ध करण्यासाठी आणखीन पाठपुरावा करणार आहे.
- आ. समाधान आवताडे, पंढरपूर- मंगळवेढा