
Madha Flood
Sakal
माढा : माढा तालुक्यात सिना नदीला आलेल्या पुरामुळे केवड गावात झाडावर आसरा घेऊन बसलेल्या व्यक्तिला रेस्क्यु टीमने मंगळवारी मध्यरात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सुखरुप बाहेर काढले. कुबेर नामदेव धर्मे या वृद्ध व्यक्तीने तब्बल १४ तास संपूर्ण पुराच्या पाण्याने वेढलेल्या झाडावर बसून धाडसाने संघर्ष करत काढले.