

Post-Flood Rehabilitation Slabs: Sakal Relief Fund Deploys ₹6 Lakh Capital to Madha Schools
Sakal
माढा : माढा तालुक्यातील सीना नदीला मागील वर्षी आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या अनेक शाळांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाच्या मदतीची वाट न पाहता वाकाव, केवड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा व दारफळ येथील नवभारत विद्यालय ही माध्यमिक शाळा सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती व माजी विद्यार्थ्यांच्या मदतीतून पुन्हा उभ्या राहिल्या असून शाळा पूर्वीपेक्षा अधिक सुसज्य ,सोयीसुविधांनी युक्त झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनाही भरपूर शालेय साहित्य मिळाले आहे.